
1970 नंतरच्या मराठी कवितेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या ज्येष्ठ कवयित्री रजनी परुळेकर यांचे आज गिरगाव येथे निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या. रजनी परुळेकर यांनी स्त्र्ायांचे भावविश्व पारदर्शीपणे कवितेतून मांडले. त्यांच्या दीर्घ कवितांनी मराठी साहित्यात वेगळी ओळख निर्माण केली होती. एवढय़ा प्रतिभावंत कवयित्रीचे विपन्नावस्थेत निधन झाल्याने साहित्य वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.
रजनी परुळेकर यांचा जन्म रत्नागिरीच्या पावस येथील त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले. एम. ए.पर्यंत उच्च शिक्षण त्यांनी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. मुंबईतल्या बुऱहाणी महाविद्यालयात त्यांनी मराठी अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांचे दीर्घकविता (1985), काही दीर्घ कविता (1993), स्वीकार (1993), चित्र (1996), पुन्हा दीर्घकविता (1999), निद्राहीन रात्रीच्या कठोर काठावर (2011) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
जगण्याच्या अनेकविध अनुभवांना परुळेकर यांनी काव्यात्म रूप दिले. त्यांची कविता व्यक्तिनिष्ठतेची चौकट ओलांडून स्त्र्ााrवादी व स्त्र्ााrनिष्ठ झाली. आयुष्यात भेटलेल्या स्त्र्ाया त्यांच्या कवितेचा विषय होता. स्त्र्ााrच्या भावजीवनाशी जोडलेल्या प्रतिमा हे त्यांच्या कवितेचे वैशिष्टय़ होते. उदाहरणार्थ ‘हिरव्या चुडय़ांसारख्या लाटा’, ‘किलोभर सुरणासारखं कुबड.’
परुळेकर यांच्या दीर्घ कवितासंग्रहाला राज्य पुरस्कार, ‘स्वीकार’ या संग्रहाला कवी कुसुमाग्रज पुरस्कार तसेच ‘चित्र’ या संग्रहाला ना. धों. महानोर पुरस्कार मिळाला आहे.































































