सुरेखा पैठणे यांना काव्य पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ कवयित्री व फुले-आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या सुरेखा पैठणे यांना लक्ष्मीबाई इंगोले काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. निवड समितीने याबाबतची घोषणा केली असून रविवार २९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. खडकपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या कवींना लक्ष्मीबाई इंगोले वात्सल्य फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून यंदाचे १५ वे वर्ष आहे, अशी माहिती वात्सल्य फाऊंडेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध कवी शिवा इंगोले यांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ राजकीय आणि सामाजिक विश्लेषक श्याम गायकवाड, अभ्यासक डॉ. संजय रामराजे, ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. डी. एस. सावंत, लेखक गजानन अलोने हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा इंगोले असून काव्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.