पोहाणेत सुखजत्रेचा उत्साह; घरोघरी मटण-चिकनचा बेत

512

जत्रा म्हटले की गर्दी असा आपला समज असतो. मात्र, मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथे एका अनोख्या अशा सुखजत्रेची परंपरा आहे. या ग्रामस्थांनी आपापल्या घरातच आज केवळ कुटुंबातील सदस्यांसोबत चिकन-मटणावर ताव मारत ही सुखजत्रा साजरी केली. त्याआधी ग्रामस्थांनी आईमाऊली देवतांना पोळी-भाताचा साधा नैवेद्य दाखवत कोरोना जाऊ दे, देश सुखी कर, सुखशांती नांदू दे, असे साकडे घातले. कोरोनाच्या संकटातही यंदाही परंपरा कायम ठेवण्यात आली.

मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील ग्रामस्थांनी सुखजत्रेची परंपरा अजूनही कायम ठेवली आहे. आषाढ महिन्यातील कुठल्याही एका दिवशी ही जत्रा साजरी केली जाते. नदीकाठाजवळील आईमाऊली देवतांचे पूजन करून पोळी-भाताचा नैवेद्य दाखवत साकडे साकडे घालतात. शाकाहारी कुटुंबांनी गोडधोड जेवणाचा आस्वाद घेतला, तर मांसाहार करणाऱया कुटुंबांनी मटण, चिकनवर ताव मारत कुटुंबासोबत सुखजत्रा साजरी केली.

आपली प्रतिक्रिया द्या