
पुण्याहून खेडच्या दिशेने निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आज पहाटे पाच वाजता पोलादपूरच्या भोगावजवळ भीषण अपघात झाला. रस्त्यावर धुक्याची चादर पसरल्याने घात झाला आणि चालकाला बॅरिकेड्स न दिसल्याने ती थेट ४५ फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील २२ जण गंभीर जखमी झाले अ असून यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कळंबनी उपजिल्हा रुग्णालय, चिपळूणमधील खासगी रुग्णालय तसेच डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे महामार्गावरील एक मार्गिका बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान रस्त्यावरील धुक्यामुळे ट्रॅव्हल्स बसचालकाचे नियंत्रण सुटले. बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या बॅरिकेट्सला धडकली आणि थेट दरीत कोसळली. या अपघातात शामल अंजर्लेकर (४०), मयुरी शिगवण (४५), काजल शिगवण (२३), दिलीप मोहिते (५५), अमरनाथ कांबळे (२७), आळंदी नाचरे (७४), दीपाली नाचरे (२७), प्रतीक गुरव (२२) प्रिया गुरव (२३), सर्वेश गुहागरकर (२२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर कळंबनी उपजिल्हा रुग्णाल यात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित जखमींवर चिपळूणमधील खासगी रुग्णालय व डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. अखेर महामार महामार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने शर्तीचे प्रयत्न करून वाहतूककोंडी फोडली.
टायर फुटून अपघात
कर्जत – सिमेंट लाद्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा मध्यरात्री अपघात झाला. नवी मुंबईच्या तुर्भे येथून पाथरजला जाताना डोंगरपाडा भागात टेम्पोचा टायर फुटला आणि तो थेट रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळला. हा अपघात पाहून कारमधील दोन तरुण मदतीसाठी पुढे आले आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पाहून चालकाला लुटून पसार झाले.
भरधाव ट्रक खांबाला धडकला
वसई – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटे ट्रक खांबाला जाऊन धडकला. या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मोहम्मद अन्वर (४३) असे चालकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची हायड्रॉलिक कटर मशीनच्या मदतीने सुटका केली. बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ कंटेनरची तीन वाहनांना धडक
चालकाचा मृत्यू
खालापूर – मुंबई-पुणे महामार्गावर आज पहाटे भरधाव कंटेनरने तीन वाहनांना जोरदार धडक दिली. बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कंटेनरच्या केबिनचा चुराडा होऊन चालकाचा मृत्यू झाला. रियाज अहमद असे त्याचे नाव आहे. चालक रियाज याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे चालत असलेल्या पिकअप, ट्रक व कारला धडक दिली. या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पिकअपमधील दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघातामुळे बोरघाटात काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
卐卐लाभ




























































