वाशीम जिल्ह्यात लाच स्वीकारताना पोलीस नाईकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe

वाशीम जिल्ह्यात 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नाईकाला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई सोमवारी सायंकाळी केली. अनसिंग पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी अनिल भगत यांनी एका प्रकरणात तडजोड करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती.

या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या आधारे कारवाई केली असता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून पोलीस नाईक अनिल भगत व खासगी वकीलाचे कारकून पांडुरंग नागरे यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आले. या प्रकरणातील आरोपी पांडुरंग नागरे फरार आहे. ही कारवाई अमरावतीचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.