राष्ट्रपती पदकाने सन्मानित पोलीस अधिकारी दोन दहशतवाद्यांसह अटकेत

860

जम्मू-कश्मीरच्या पोलीस अधिकार्‍याला शनिवारी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांसह श्रीनगर-जम्मू महामार्गावर अटक करण्यात आली. हे दहशतवादी दिल्लीच्या दिशेने निघाले होते. डीएसपी दविंदर सिंह असे या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून तो श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी दविंदर सिंह याला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दक्षिण कश्मीरमध्ये 11 जणांची हत्या केल्याचा नवीद बाबूवर आरोप आहे. जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा हटवल्यानंतर एकापाठोपाठ एक हत्या होण्याचे सत्र सुरू झाले. सफरचंद उद्योगाला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने या हत्या करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान नवीद बाबूच्या हालचालीवर पोलीस नजर ठेवून होते. त्याने जेव्हा आपल्या भावाला फोन केला तेव्हा त्याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी वनपोहमध्ये एक गाडी रोखली. या गाडीत दविंदर सिंहदेखील होता. शनिवारी दविंदर कामावर गैरहजर होता. पुढील चार दिवसांच्या सुट्टीसाठीही त्याने अर्ज केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या