चेकपोस्टला थांबविल्याने पोलिस शिपायाचा मोडला हात, येरवडा चेकपोस्टवरील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pune-police

चेकपोस्टवर थांबविल्याचा राग मनामध्ये धरुन येरवडा कारागृहात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पोलीस शिपायाचा हात मोडला आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री आठच्या सुमारास येरवडा कारागृह वसाहतीकडे जाणाऱ्या चेकपोस्टवर घडली.

प्रेमनाथ वाडीकर असे गुन्हा दाखल केलेल्याचे कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राजेंद्र खैरनार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र येरवडा कारागृहाचे शिपाई असून दोन दिवसांपुर्वी ते चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या कारागृह कर्मचारी प्रेमनाथला राजेंद्रने थांबविले. त्याचा राग आल्यामुळे प्रेमनाथने त्यांना शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हाताला झटका देउन फ्रॅक्चर करीत डोळ्यावर बुक्की मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीनेश गुर्जर तपास करीत आहेत.