
सामना प्रतिनिधी । ठाणे
खासगी मोटर्स कंपनीने भंगारात लिलावात काढलेली वाहने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आरटीओत नोंदणी करून विकणाऱया टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात पोलिसांनी बीड आरटीओ कार्यालयाचे दोन आरटीओ इन्स्पेक्टर, एजंट व दलालाच्या दोन कोटी 23 लाखांच्या वाहनांसह मुसक्या आवळल्या आहेत.
लहानमोठ्या त्रुटी अथवाती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव यांच्या पथकाने स्क्रॅप वाहने विकत घेणाऱया सचिन सोनावणे व बनावट कागदपत्रे बनवून बीड आरटीओ कार्यालयात नोंदणी करणारा एजंट सय्यद अहमद या दोन आरोपींना अटक केली.























































