
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक व महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यानुसार संजय पांडे यांनी आज सकाळी पदाची सूत्रे हाती घेतली. 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या संजय पांडे यांच्याकडे सध्या महाराष्ट्र राज्याच्या महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालकाचा कार्यभार आहे.





























































