पोलिसाने केली आत्महत्या 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कस्तुरबा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपाईने लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोविंद चारोसकर असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

गोविंद हे नालासोपारा येथे कुटुंबीयांसोबत राहत होते. ते कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी गोविंद हे डय़ुटीला आले. डय़ुटी संपवून घरी जात होते तेव्हा त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली. त्यानंतर गोविंद यांनी लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती समजताच वसई रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. गोविंदकडे सापडलेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे त्यात लिहिले होते. गोविंद यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.