अप्पर पोलीस अधीक्षकाच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

889

गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक ढोले यांचे वाहन चालक मदन गौरकार

यांनी आज 7 जुलै रोजी स्वतःवर रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

मदन गौरकार यांनी अप्पर पोलीस अधीक्षक ढोले यांच्या बंगल्यावरच स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. गौरकार हे 1992 मध्ये गडचिरोली पोलीस दलात रूजू झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या