पिंपरी – पोलिस कर्मचाऱ्याचा मुळा नदीत बुडून मृत्यू

मुळा नदी पात्रात पोहताना बुडाल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सांगवीतील वेताळनगर येथे घडली.

अमित सुभाष खांडेकर (वय -37, रा. पोलिस वसाहत, चव्हाणनगर, पाषाण) असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खांडेकर हे पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते.

शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास खांडेकर हे वेताळनगर येथील मुळा नदी पात्रात उतरले. नदी घाटावर त्यांनी कपडे काढून ठेवले होते. मात्र, पोहत असताना ते अचानक बुडाले. शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सांगवी पोलिस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या