
सामना ऑनलाईन । ठाणे
गटारीच्या निमित्ताने ‘फुल टू तर्राट’ होऊन शहरातील रस्त्यांवर धुडगूस घालणाऱ्या 215 तळीरामांकर ठाणे वाहतूक शाखेच्या विशेष पथकांनी दोन दिवसांत कारवाई केली. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 18 युनिटमधील विशेष पथकांनी मद्यधुंद बाईकस्वार आणि कारचालकांकर कारकाई करून तब्बल चार लाख 30 हजारांचा दंडही वसूल केला. त्यामुळे यंदाची गटारी तळीरामांच्या चांगलीच लक्षात राहणारी ठरली.
श्रावणाच्या आगमनाआधीच आठवडाभर जागोजागी तळीरामांकडून पाटर्य़ा झोडल्या जातात. त्यातून विविध ठिकाणी होणारे अपघात आणि गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी वाहतूक शाखेने 18 युनिटमध्ये एक वरिष्ठ अधिकारी आणि चार कर्मचाऱयांचे विशेष पथक तयार केले होते. या पथकाकडून शहरात जागोजागी नाकाबंदी करून तळीरामांकर कारकाई करण्यात आली. यामध्ये दोन हजारांचा दंड न भरणाऱया चालकांची वाहने जप्त करून दंडाची रक्कम दिल्यानंतरच त्यांना गाडय़ा दिल्या जाणार असल्याचे वाहतूक शाखेच्या वागळे युनिटचे पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले.
येऊरच्या प्रवेशद्वाराकर पोलिसांची फिल्डिंग
येऊरच्या जंगलात जाऊन धुडगूस घालणाऱ्या तळीरामांना रोखण्यासाठी येऊर एन्वार्मेटल सोसायटी (येस) तर्फे ग्रीन गटारीचे आवाहन करण्यात आले होते. यंदा या उपक्रमाचे पाचके वर्ष असून या मोहिमेस यशस्वी करण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, येऊरचे परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पकार, राऊंड फॉरेस्ट ऑफिसर सुजय कोळी, येसचे समन्कयक रोहित जोशी यांनी विशेष मेहनत घेतली. येऊरच्या गेटवरच स्थानिक पोलीस, काहतूक शाखा व वनकिभागाचे कर्मचारी, येसच्या स्कयंसेवकांनी कडक फिल्डिंग लाकून जंगलात जाणाऱया तळीराम पर्यटकांना माघारी धाडले.
































































