रायफल साफ करताना चुकून गोळी सुटली, पोलीस शिपायाचा मृत्यू

835

सामना प्रतिनिधी, गडचिरोली

रायफल साफ करताना चुकून गोळी सुटल्याने एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. संजीव शेट्टीवार असं या पोलिसाचं नाव आहे. गडचिरोली पोलीस दलातील सिरोंचा क्युआरटी येथे शेट्टीवार कार्यरत होते.

मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमाराला ते रायफल साफ करत होते. त्यावेळी चुकून गोळी सुटली आणि ती त्यांना लागली. यावेळी त्यांचे कुटुंबीयही सोबत होते. कुटुंबीयांनी ही बाब पोलिसांना सांगितली असून गडचिरोली पोलीस दल पुढील तपास करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या