
पोलीस बनायचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या बुलढाण्याच्या 28 वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. मैदानी झाल्यानंतर आराम करत असताना त्याची दातखिळी बसली. इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अक्षय म्हसाळ (28) असे त्या तरुणाचे नाव होते. सोमवारी सकाळी रेल्वेच्या घाटकोपर येथील मैदानात त्याची मैदानी चाचणी झाली. त्यानंतर मैदानापासून जवळ असलेल्या एका मंदिरात तो मित्रासोबत आराम करत होता. पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अक्षयची दातखिळी बसली. त्यामुळे त्याला तत्काळ राजावाडी इस्पितळात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अक्षयला नेमका कसला त्रास झाला ते समजू शकले नाही.
28-Year-Old Police Aspirant Dies During Recruitment Drive in Mumbai
A tragic incident in Ghatkopar as a 28-year-old youth from Buldhana passes away after completing his physical tests for the Maharashtra Police recruitment.





























































