
चोरी आणि गहाळ झालेल्या वस्तू परत करून पोलिसांनी तक्रारदार यांना सुखद धक्का दिला. परिमंडळ-8मधील पोलीस ठाण्याअंतर्गत तक्रारदार याना मुद्देमाल परत करण्याबाबत आज कार्यक्रम आयोजित केला होता. 237 जणांना वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
परिमंडळ 8 अंतर्गत खेरवाडी, बीकेसी, निर्मल नगर, सहार, विलेपार्ले, विमानतळ पोलीस ठाणे येतात. या पोलीस ठाण्यात दागिने, वस्तू, मोबाईल चोरी, दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल केले जातात. पोलीस तपास करून आरोपीना बेड्या ठोकतात. त्यांच्याकडून तक्रारदार यांचे वस्तू, साहित्य जप्त केले जाते. न्यायालयाच्या आदेशाने ते तक्रारदार यांना परत केले जाते. आज परिमंडळ 8चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात या वस्तू परत करण्यात आल्या.