पोलिओ लसीकरणासाठी आलेल्यांना समजले जनगणना अधिकारी, ग्रामस्थांकडून मारहाण

402

पोलिओ डोस पाजण्यासाठी आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना मेरठ येथे घडली आहे. पोलिओ डोस पाजण्यासाठी आलेले कर्मचारी जनगणना नोंदीसाठी आलेले कर्मचारी वाटल्याने ही घटना घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

शनिवारी मेरठ येथे सरकारी वैद्यकीय पथक पोलिओ लसीकरणासाठी गेलं होतं. लसीकरणासोबत पोलिओ सर्वेक्षणासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना त्यांच्या मुलांविषयी काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांमुळे स्थानिक लोकांना ते जनगणना अधिकारी असावेत असं वाटल्याने त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. वादाची परिणती मारहाणीत झाली आणि कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी डांबून ठेवलं.

पोलिसांना या घटनेबाबत कळताच त्यांनी तत्काळ धाव घेतली. वैद्यकीय कर्मचारी हे पोलिओ सर्वेक्षणासाठी प्रश्न विचारत असल्याचं ग्रामस्थांना पटवून देऊन पोलिसांनी कर्मचाऱ्यांची सुटका केली.

आपली प्रतिक्रिया द्या