हिंदुस्थानवर पुन्हा पोलिओचे सावट, महाराष्ट्र आणि युपी अलर्टवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मानवी शरीराला लुळा करणारा पोलिओ हिंदुस्थानात पुन्हा येऊ शकतो. दिल्लीच्या गाजियाबादमधील मेडिकल कंपनीत बनवलेल्या पोलिओ लसमध्ये पोलिओचा व्हायरस सापडला आहे. ही लस महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्यात वितरित केली होते. त्यामुळे आरोग्य विभागाने कारवाई करत कंपनीच्या अधिकार्‍यांना अटक केली आहे.

2014 साली जागतिक आरोग्य संघटनेने हिंदुस्थानला पोलिओमुक्त घोषिट केले होते. दिल्लीच्या बायॉमेड ही कंपनी ओरल पोलिओ लसची निर्मिती करते. या लसमध्ये टाईप-२ पोलिओ व्हायरसचे अंश आढळले आहेत. या लसचे वितरण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झाले होते. त्यापैकी उत्तर प्रदेशमधील या औषधाच्या नमुन्यात हा व्हायरस आढळला आहे. आरोग्य मंत्रालयाने तत्काळ कारवाई करत हा व्हायरस काढण्यासाठी हालचाल सुरू केली आहे, तसेच कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून मॅनेजरला अटक केली आहे. कंपनीच्या सर्व औषध निर्मिती आणि वितरणावरही बंदी घालण्यात आली आहे.