
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत कर्नाटकात दुधावरून राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या आठवडय़ात अमूल इंडियाने ट्विट करत कर्नाटकात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. अमूलच्या या घोषणेनंतर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. गुजरातमधील अमूल कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकार कर्नाटक मिल्क फेडरेशनचा ‘नंदिनी’ हा स्थानिक ब्रँड संपवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या या आरोपामुळे कर्नाटकात अमूलच्या विरोधातही लोकांमध्ये रोष वाढत असून सोशल मीडियावर #GoBackAmul या नावाने ट्रेंड सुरू झाला आहे. तर विरोधक या मुद्दय़ाचे उगाच राजकारण करत असल्याची टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.



























































