राजकारण ही रेल्वेगाडी – नितीन गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनतेने काम करण्याची संधी नगरसेवकाच्या माध्यमातून दिली हाच एक पुरस्कार असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण ही रेल्वे गाडी आहे. प्रत्येक स्टेशनवर अनेक जण चढतात आणि उतरतात. गाडीचा डबा कितीही मोठा असला तरी आतील लोक बाहेरच्याला येऊ देत नाही. राजकारणातही तसेच आहे. जीवनभर मीच राहावे असे सर्वांना वाटते. पण अत्यंत कठीण आणि विसंगत परिस्थितीत काम करावे लागते, याकडे गडकरी यांनी शुक्रवारी लक्ष  वेधले. महानगर पालिकेत मान्यवरांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.