मालवणात मतदान जनजागृती फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

जागरूक मतदाराचे एकच लक्ष्य, नक्कीच बजावतो मतदानाचा हक्क… मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा… अशा घोषणा देत मालवण धुरीवाडा येथील लक्ष्मीबाई देसाई टोपीवाला कन्याशाळा व सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर संलग्न गुरुवर्य वि. अ. आजगावकर प्राथमिक कन्याशाळा यांच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवणात मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार या मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कन्याशाळा धुरीवाडा ते बोर्डिंग ग्राऊंड या मार्गावरून ही फेरी काढण्यात आली. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी फलक व घोषणांद्वारे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करून मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन केले.

यावेळी मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण शिंदे, सौ. वैशाली चव्हाण, प्रवीण साबळे, सौ. श्वेता राळकर, सौ. ज्योती पाटणकर, सौ. शिवानी करलकर, आकांक्षा कासले, प्रविण साबळे, सौ. नुतन राऊळ, सुधीर गोसावी आदी व इतर शिक्षक उपस्थित होते.