
निवडणूक यंत्रणेच्या गलथान कारभाराचा जोरदार फटका आज वनमंत्री गणेश नाईक यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बसला. हरवलेले मतदान केंद्र शोधण्यासाठी नाईक यांना सुमारे तासभर फिरावे लागले. सुरुवातीला ते कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत गेले. मात्र तिथे नाव नसल्यामुळे त्यांना सेंट मेरी हायस्कूलमध्ये पाठवण्यात आले, परंतु तिथे त्यांचे नाव नसल्याने नाईकांच्या संतापाचा भडका उडाला. ते पुन्हा सीबीएसई शाळेत आले. नंतर पुन्हा त्यांनी सेंट मेरी हायस्कूलमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.































































