वादग्रस्त पूजा खेडकर यांची आयएएस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय जारी केला आहे. आयएएस नियम 1954 च्या नियम क्रमांक 12 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
युपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या जामिनाला विरोध केला होता. पूजाने फक्त युपीएससीची फसवणूक केली नसून, परीक्षेच्या संधी संपल्या असतानाही तिने युपीएससीच्या परीक्षा दिल्या आहेत. पूजा खेडकर सध्या जामिनावर बाहेर असून तिने ओबीसी आणि दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्रही सादर केले होते.
युपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या जामिनाला विरोध केला होता. पूजा खेडकर यांच्या निवडीत मोठा घोटाळा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तसेच पूजा सोबत अनेक लोक सहभागी असल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला होता. जुलै महिन्यात युपीएससीने पूजा खेडकर यांची निवड रद्द ठरवली होती. परीक्षेदरम्यान खोटी कागदपत्र सादर केल्याचा ठपका युपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर ठेवला होता.