पॉर्न स्टारचा संशयास्पद मृत्यू, घरात सापडला मृतदेह

1499

200 हून अधिक पॉर्न चित्रपटात काम केलेली प्रसिद्ध स्टार जेसिका जेम्सचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जेसिकाचा मृतदेह कॅलिफोर्नियातील तिच्या राहत्या घरी आढळला असून तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही.

जेसिका ही कॅलिफोर्नियातील नॉर्थ हिल्स भागातील हेवनहर्स्ट एवेन्ह्यूमध्ये राहायची. काही दिवसांपूर्वीच जेसिका व तिच्या नवऱ्याने घटस्फोट घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे तो तिच्यापासून वेगळा राहू लागला होता. दोन तीन दिवसांपासून तो जेसिकाला फोन करत होता. मात्र ती फोन उचलत नव्हती. अखेर तो तिच्या घरी गेला. मात्र तिने दरवाजा देखील न उघडल्याने तिच्या पतीने याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी तिच्या घराचा दरवाजा तोडला तेव्हा जेसिका मृतावस्थेत आढळून आली.

आपली प्रतिक्रिया द्या