कठोर निर्बंधांचे ‘कडक’ परिणाम;  सक्रिय रुग्ण 23 हजारांनी कमी, 3600 प्रतिबंधित क्षेत्रे घटली

मुंबईसह राज्यात एप्रिलच्या मध्यापासून लावण्यात आलेले निर्बंध आणि 1 मेपासून लावलेल्या कठोर निर्बंधांचे ‘कडक’ परिणाम आता दिसू लागले आहेत. 1 मेपासून आतापर्यंत मुंबईत 3649 प्रतिबंधित क्षेत्रे घटल्यामुळे तब्बल 9 लाख 70 हजार रहिवाशांची नियमांच्या कचाटय़ातून सुटका झाली आहे. शिवाय सक्रिय रुग्णांची संख्याही 22,916 इतकी झाली आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शिवाय राज्य सरकाने एप्रिलच्या अखेरीस दिवसभरासाठीची नियमावली आणि ‘विकेंड’साठी कठोर निर्बंधही यासाठी कारणीभूत ठरले आहेत. सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाल्याने कोरोना प्रसारास आता चांगलाच आळा बसला आहे. मुंबईत चाचण्यांचे प्रमाण 50 हजारांपर्यंत वाढवून प्रभावी उपाययोजना केल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत.

बारा दिवसांत 3 लाख 71 हजार चाचण्या

  • मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 54 हजार 23 हजार 998 चाचण्या करण्यात आल्या. 12 मेपर्यंत या चाचण्यांची संख्या 57,95,188 वर पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या बारा दिवसांत तब्बल 3 लाख 71 हजार 190 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत दररोज 30 ते 35 हजार चाचण्या केल्या जात आहेत.
  • फेब्रुवारी मध्यानंतर काढत गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या दररोज 10 ते 11 हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र सरकारकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सध्या मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या 1700 पर्यंत खाली आली आहे.
  • मुंबईत 26 एप्रिल ते 11 मेमध्ये नकीन रुग्ण संख्या 48,459 इतकी नोंदकिण्यात आली. त्याचकेळी पंधरकडय़ात 1,159 रुग्ण मृत पाकले आहेत. मात्र या 15 दिवसांत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या 85,369 इतकी झाली.

अशी झाली सुधारणा

  • 30 एप्रिल रोजी मुंबईत 64 हजार 018 सक्रिय रुग्ण होते. 12 मेपर्यंत यात 22 हजार 916 ने घट होऊन सक्रिय रुग्णांची संख्या आता 41 हजार 102 इतकी झाली आहे.
  • चाळी-झोपडपट्टय़ांतील कंटेनमेंट झोनची संख्या 112 वरून 80 वर, सील इमारतींची संख्या 1017 वरून थेट 444 वर आणि सील मजल्यांची संख्या 10 हजार 299 वरून थेट 7255 पर्यंत खाली आली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या