अभय योजनेला रहिवाशांचा प्रतिसाद; म्हाडाच्या तिजोरीत 5 कोटी भाडे जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर व उपनगरातील म्हाडाच्या वसाहतींमधील रहिवाशांसाठी थकित सेवा शुल्क भरण्यासाठी लागू झालेल्या अभय योजनेच्या पहिल्या व दुस-या योजनातून म्हाडाच्या तिजोरीत 5 कोटी 31 लाख 18 हजार 333 रुपये थकित भाडे जमा झाले आहे. रहिवाशांकडून या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून म्हाडाने आता   अभय योजनेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे.

तिस-या टप्प्यातील यामध्ये 1 मे ते 31 जुलै या कालावधीत संपूर्ण थकित भाडे भरल्यास रहिवाशांना थकित भाडय़ावरील व्याजावर चाळीस टक्क्यापर्यंतची सवलत देण्याची घोषणा आज करण्यात आली

मुंबईत म्हाडाच्या 56 हून अधिक वसाहती आहेत. म्हाडातर्फे या वसाहतींना पंपमन इलेक्ट्रिशियन, सुरक्षा रक्षक, लिफ्ट देखभाल-दुरुस्ती, पाणी पुरवठा सफाई कामगार अशा विविध सेवा पुरविल्या जातात त्यापोटी म्हाडा या वसाहतींमधील रहिवाशांकडून सेवाशुल्क वसूल करते. हे थकित सेवा शुल्क वसूल करण्यासाठी म्हाडाने अभय योजना जाहीर केली आहे.

दरम्यान म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व मंडळाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांकडे थकित भाडे व त्यावरील व्याजापोटी सुमारे 129 कोटी 92 लाख रुपये थकित आहेत.