गुरुग्राममध्ये नमाज पठणाचा वाद चिघळण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरुग्राममध्ये नमाज पठणाचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. सेक्टर 12 मध्ये जेथे प्रत्येक शुक्रवारी नमाज पठण केले जायचे, तेथे गेल्या आठवडय़ात हिंदू संघटनांनी गोवर्धन पूजा केली आणि शेणीही थापल्या. या शुक्रवारीही सकाळी हिंदू संघटनांचे लोक शेंगदाणे खात होते. वाट्टेल ती किंमत मोजू, पण या ठिकाणी नमाज पठण होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा हिंदू संघटनांनी घेतला आहे, तर मुस्लिम संघटनांनी यावर कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. हिंदू संघटनांनी येथे व्हॉलीबॉल कोर्ट बांधणार असल्याचेही जाहीर केले आहे.