
>> श्रीकांत पोहनकर
समस्या निर्माण झाल्या की मेहनत करून पिकवलेला शेतमाल रस्त्यावर फेकणे आणि नुकसानभरपाई मागणे हे कोरोनानंतरच्या जगात शक्य होणार नाही. दूरदृष्टीनेच शेती करावी लागेल. कोरडा व ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस व गारपीट, वादळं व विषाणूंचा हल्ला यासारख्या समस्या उद्भवणारच याची खूणगाठ मनाशी बांधून पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी लागणार आहे. कोरोनाचा हल्ला ही शेतकऱयांना हुशार बनवणारी सुवर्णसंधी आहे.
कोरोनाच्या भयानक व जीवघेण्या वादळाने सर्व क्षेत्रांप्रमाणेच कृषी क्षेत्रालाही जबरदस्त फटका दिला आहे. हे वादळ संपल्यानंतर जे शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करतील त्यांचे यानंतर फारसे भवितव्य राहणार नाही. कोरोनानंतरचे जग हे अत्यंत आव्हानात्मक असेल. त्यामुळे शेतीतील नवनवीन कल्पक आणि विषमुक्त तंत्रज्ञान शिकून घ्यावे लागेल. सेंद्रीय शेती करणाऱयांचे चांगले दिवस येतील.
कोरोनाचे संकट येण्याआधी शेतकरी जसे वागत होते तसेच ते या संकटानंतरही वागत राहिले तर त्यांच्या समस्या कायमच राहतील. या काळात खिशात पुरेसे पैसे नसतानाही प्रगती करायची झाल्यास त्यांना भावनिकता दूर ठेवून बुध्दी आणि कल्पकतेने कामे करावी लागणार आहेत. उद्याचे जग हे कोरोनासारख्या विषाणूंच्या हल्ल्याचे असू शकते. या जगात ज्यांची रोगप्रतिकार शक्ती बळकट तेच जगू शकतील. संकरित बियाणे, रासायनिक खते व जहाल विषारी कीटकनाशके वापरून उत्पादित अन्नधान्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढणे अजिबात शक्य नाही. त्यामुळे उद्याची शेती ही प्राधान्याने सेंद्रीय आणि विषमुक्त शेती असेल, हे शेतकऱयांनी लक्षात घेतले पाहिजे.
साधे ‘बिग बास्केट’ या कंपनीचे उदाहरण घ्या. ऑनलाईन ऑर्डर्स बुक करण्यासाठी प्रचंड गर्दी होत असून माल घरोघरी पोहोचवण्यासाठी या कंपनीला हिंदुस्थानात कमीतकमी दहा हजार कर्मचारी हवेत. दलालांना टाळून थेट ग्राहकांना शेतमाल विकण्याची शेतकऱयांना धडपड करावी लागेल.
समस्या निर्माण झाल्या की पैसा व मेहनत करून पिकवलेला शेतमाल रस्त्यावर फेकणे, तयार भाजीपाला जनावरांना खायला देणे, उभ्या पिकात ट्रक्टर चालवणे आणि सरकारला नुकसानभरपाईची मागणे हे कोरोनानंतरच्या जगात चालणार नाही. दूरदृष्टीनेच शेती करावी लागेल. कोरडा व ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस व गारपीट, वादळं व विषाणूंचा हल्ला यासारख्या समस्या उद्भवणारच याची खूणगाठ मनाशी बांधून पर्यायी क्यकस्था तयार ठेवावी लागणार आहे. कोरोनाचा हल्ला ही शेतकऱयांना हुशार बनवणारी सुवर्णसंधी आहे.
केवळ एकाच पिकाची लागवड आर्थिकदृष्टय़ा यशस्वी ठरणार नाही. अनेक पिकांची लागवड हा शेतीचा किमा असेल. एखाद्या पिकाला किफायतशीर भाव मिळाला नाही तर इतर पिके मदतीला येतील. शिवाय शेतीमालावर प्रक्रिया करून, पिकांचे मूल्यवर्धन करून शेतकऱयांना पैसा कमवावा लागेल. फेसबुक, व्हॉट्सऍपवरील सल्ले वाचून शेती करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. त्यांच्या शंकांना दिली जाणारी स्वयंघोषित शेतीतज्ञांची उत्तरे अनेकदा अत्यंत भयंकरच असतात. कोरोनानंतरच्या जगात अशा गाफील शेतकऱयांना भकितव्य नसेल.
शेतकऱयांची ढोबळ मानाने दोन प्रकारांमध्ये विभागणी करता येईल. पहिल्या प्रकारात ‘या जगात काहीही शक्य नाही’ अशा मानसिकतेचे शेतकरी आहेत. हे शेतकरी प्रत्येक समस्येला यशस्वीरीत्या तोंड देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. नैसर्गिक आपत्ती वभारनियमन, हमीभाव, शेतमालाचे भाव पाडणारे निर्णय यासारख्या मानवनिर्मित आपत्तींशी ते सतत सामना करीत असतात. कधीही हार न मानणाऱया लढकय्या प्रकृत्तीमुळे किकिध उपाय शोधून ते आयुष्यात यशस्की होतात. समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग ‘हिंदुस्थानी जुगाड’ या नावाने जगभरातील शेतकऱयांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत आणि त्यांचे यूटय़ुबवर असंख्य व्हिडिओज उपलब्ध आहेत. सकारात्मक विचारसरणी असलेले हे शेतकरी पंजाब-हरयाणामधील गावागावात आहेत.
दुसऱया प्रकारच्या शेतकऱयांमध्ये शेतीबद्दल वैचारिक स्पष्टता नसलेले, कोणी कितीही चांगला सल्ला दिला तरी न ऐकणारे, शेतीत निसर्गनिर्मित किंवा मानवनिर्मित कोणतीही समस्या निर्माण झाली की सरकारी मदतीची अपेक्षा ठेवणारे, मानसिकदृष्टय़ा दुर्बळ असल्याने आत्महत्येचा मार्ग अपरिहार्यपणे स्वीकारणारे असे शेतकरी आहेत. अळ्यांचा नायनाट करण्यासाठी अत्यंत महागडी रासायनिक कीटकनाशके वापरताना जेव्हा एका पंपाला 100 ते 150 रुपये खर्च येत होता तेक्हा पोहनकर फाउंडेशनने केवळ 30 रुपये खर्चाचा अत्यंत प्रभावी फॉर्म्युला शेतकऱयांना विनामूल्य उपलब्ध करून दिला. या फॉर्म्युल्यावर अनेक राज्यांत असंख्य शेतकरी यशस्वी झाले. जे शेतकरी निसर्गनिर्मित मानवनिर्मित संकटांना घाबरून आपल्या शेतमालाची नासधूस करतात, त्यांच्यासाठी त्याच शेतमालापासून लाखो रुपये कमावण्याचे उपाय आहेत.
कोरोनाच्या झटक्यानंतरचे शेतकरी कोणत्याही संकटाच्या बाबतीत अत्यंत सतर्क, हुशार व भावनांच्या आहारी न जाता शेती करणारे असतील. कोरोनाच्या धसक्याने जगभरातील ग्राहक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विषमुक्तच अन्न खातील व त्यांना लागणारा शेतीमाल चांगल्या भाकात विकण्याचे विविध व अनोखे उपाय शेतकरी शोधतील. उदा. सोयाबीनवर प्रक्रिया करून तब्बल 52 उत्पादने तयार करता येतात क गडगंज पैसा कमावता येतो हे शेतकऱयांना समजावून घ्यावे लागेल. बाजार समितीत 50 रु. किलोने खरेदी केली जाणारी तूर सेंद्रिय असल्यास तिची डाळ 120 ते 130 रु. किलो या भाकाने ग्राहक खरेदी करतात. नारळाच्या करवंटय़ापासून ऍक्विव्हेटेड चारकोल तयार करून कोटय़वधी रुपयांची कमाई करता येते.
विषमुक्त शेतमालाला संधी
जगभरात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱया विषमुक्त शेतमालाला प्रचंड मागणी असेल. त्याचा पुरवठा करण्यासाठी मोठमोठय़ा कंपन्या पुढे येतील. आजच अशा अनेक कंपन्यांनी किराणा, भाजीपाला, धान्य, दूध, दही, ताक माफक दरात घरोघरी पोहोचवण्यास सुरूवात केली आहे. सेंद्रीय शेती करणाऱया शेतकऱयांना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱयांना कवडीमोल दरात आपला शेतमाल किकण्याऐवजी अशा कंपन्यांना विकून बक्कळ पैसा कमावता येईल.
z [email protected]
(लेखक पोहनकर फाउंडेशन, पुणे विभागाचे अध्यक्ष आहेत)




























































