क्या खूब ठगती हो! प्रियंकाविरोधात पोस्टरबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघ अमेठीच्या दौऱयाकर असून त्यांच्या या दौऱयाविरोधात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. एका पोस्टरवर ‘क्या खूब ठगती हो, क्यों 5 साल बादही, अमेठी दिखती हो।’ असे म्हटलेले होते तर अन्य एका पोस्टरकर देख चुनाक, पहन ली साडी, नहीं चलेगी, ये होशियारी। असे नमूद करण्यात आले. मात्र प्रियंका आणि राहुल यांच्या आगमनापूर्की हे पोस्टर्स हटकण्यात आले.

क्या खूब लगती हो! उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये
‘क्या खूब लगती हो…’ असे म्हणत लाखो ‘रंगीला’ जिच्या सौंदर्यावर घायाळ झाले त्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तिचे पक्षात स्वागत केले. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आदी उपस्थित होते. बालपणापासून आपल्यावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव असल्याने आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी उर्मिलाने सांगितले. तिला उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.