
वीज कामगारांच्या मागण्यांवर ऊर्जा सचिव आणि महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले वीज कामगार, अभियंत्यांचे काम बंद आंदोलन तूर्तास स्थगित केले असल्याचे वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने स्पष्ट केले आहे. वीज कामगारांच्या मागण्यांबाबत ऊर्जा विभाग, वीज कंपन्या आणि संयुक्त कृती समितीची सोमवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. यामध्ये वीज कामगारांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा मिळावा म्हणून ऊर्जा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.




























































