
जन्माष्टमीचा मुहूर्त साधत साऊथ सुपरस्टार प्रभासच्या बहुचर्चित ‘राधे श्याम’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पोस्टरमध्ये प्रभास एका सुंदर टक्सिडोमध्ये आणि पूजा हेगडे आकर्षक निळ्या रंगाच्या बॉल गाऊमध्ये दिसत आहे. पोस्टर पाहताना एखाद्या परिकथेसारखा फील येतो. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या बहुभाषिक चित्रपटात 1970 मध्ये युरोपमध्ये घडणारी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये चित्रीकरण पार पडले आहे. अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्टस्ने सज्ज राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरत असून यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपामध्ये दिसणार आहेत. 14 जानेवारी 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.





























































