
शिवजयंती निमित्त प्रबोधन पुर्ला शाळेने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या शिवकालीन कथाकथन स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. याप्रसंगी महाराष्ट्रातील गड, किल्ल्यांचे छायाचित्र आणि ऐतीहासिक पुस्तकांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील एच.व्ही.देसाई कॉलेज चे प्राचार्य व इतिहास संशोधक डॉ गणेश राऊत यांना आमंत्रित करण्यात आले होते.राऊत यांच्या हस्ते या शिवकालीन कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना पारितोषिक व सन्मानचिन्हाचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊ कोरगांवकर, विश्वस्त शलाका कोरगावकर, निलेश कोरगावकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विशाखा परब सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.
प्रबोधन पुर्ला शाळा व पल्लवी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. कथाकथन स्पर्धेचे परीक्षण इतिहास तज्ञ गणेश धालपे यांनी केल़े. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी शुभांगी मेमाणे, विशाखा परब, संतोष चिकणे हे ठरले व उत्तेजनार्थ क्रमांक भारत पाटील, विलास पळसमकर, सुरेश जाधव यांना मिळाले या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ राऊत यांनी विद्यार्थी व शिक्षक वर्गाला इतिहास या विषयावर बहुमूल्य असे मार्गदर्शन केले व आपल्या भाषणात त्यांनी इतिहास या विषयासाठी एखादा विद्यार्थी दत्तक घेण्याची तयारी देखील दर्शिवली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष चिकणे, शुभांगी मेमाणे यांनी तर पाहुण्यांचे स्वागत व ओळख विलास पळसमकर यांनी केले.






























































