
मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कर्नाटकातील जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार, खासदारांच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाने आज हा निकाल दिला.
34 वर्षीय रेवण्णा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. त्याच्या विरोधात बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणाचा निकाल आज आला. जन्मठेप आणि दहा लाखांचा दंड न्यायालयाने ठोठावला.
माय लॉर्ड, माझी चूक फक्त एकच आहे!
निकाल येताच प्रज्वल रेवण्णा कोलमडून पडला. त्याला अश्रू अनावर झाले. न्यायाधीशांकडे तो दयेची याचना करू लागला. ‘मी बीई मेकॅनिकलकल आहे. प्रत्येक वेळी मेरिटने पास झालोय. माझी चूक इतकीच आहे की, राजकारणात माझी झटपट प्रगती झाली. माझ्याविरोधात हे सगळे जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे, असा दावा त्याने केला.