काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांची माओवाद्यांना मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे पोलिसांनी पाच ‘शहरी नक्षलवाद्यांना’ अटक केल्यानंतर त्यातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. पुणे पोलिसांनी रोना विल्सन याच्या जप्त केलेल्या लॅपटॉपमधून फरार माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याने विल्सनला लिहिलेले पत्र सापडले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून भारिप- बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमधील काही मित्रही मदत करणार आहेत. याचा फायदा ‘सीपीआय मोओवादी’ संघटनेला होणार आहे असा स्पष्ट उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर २ जानेवारी रोजी हे पत्र लिहिले गेले आहे.

बुधवारी पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर, दिल्लीतून सुधीर ढवळे, ऍड. सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, दीपक राऊत आणि रोना विल्सन यांना अटक केली. यासंदर्भात सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पोलीस उपायुक्त संजीवकुमार बाविस्कर, डॉ. प्रवीण मुंढे, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यावेळी उपस्थित होते.

एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. हा निधी ऍड. गडलिंग आणि रोना विल्सन या दोघांच्या माध्यमातून सुधीर ढवळे यांना देण्यात आला होता. एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांकडून पैसा आल्याचे भक्कम पुरावेही सापडले आहेत. हा पैसा कोणाकडून आला, किती आला याचा तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.

पाच जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी
एल्गार मेळाव्याच्या आयोजनामध्ये माओकादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणाकरून अटक करण्यात आलेल्या पाच जणांना किशेष न्यायाधीश एस. भैसारे यांनी १४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेकण्याचा आदेश दिला आहे.

” देशात उसळलेल्या हिंसक आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या काही नेत्यांची मदत घेता येईल असा उल्लेख फरार माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याने रोना विल्सन याला लिहिलेल्या पत्रात आहे. त्यामुळे आंबेडकर व इतरांचा यामध्ये अप्रत्यक्ष सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे”

– रवींद्र कदम, सहआयुक्त

‘‘माझ्याकडे आत्ता कोणतेही डॉक्युमेंट नाही. मी पुण्यात किंवा मुंबईत आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडेन. या पत्राबाबत मी आत्ता काहीही बोलू शकत नाही.’’
– प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष – भारिप बहुजन महासंघ