‘त्या’ गरोदर हत्तिणीच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करणार

1147
प्रकाश जावडेकर – पर्यावरण, माहिती प्रसारण

केरळमध्ये एका गर्भवती हत्तिणीला फटाके भरलेले अननस खायला दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. सोशल मीडियावरून त्या हत्तिणीच्या मृत्यूवर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड व मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी आता केंद्र सरकारने देखील कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘केरळच्या मल्लपुरममधील केंद्र सरकारने हत्तिणीच्या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे. आरोपींना पकडण्यासाठी आम्ही कोणतीही कमी ठेवणार नाही. फटाके खायला घालून मारणे ही हिंदुस्थानी संस्ती नाही.’, असे ट्विट जावडेकर यांनी केले आहे.

केरळला लाज वाटायला पाहिजे! मराठी अभिनेत्री संतापली

मल्लपुरम येथे एक हत्तीण भूक लागल्याने अन्नाच्या शोधात फिरत होती. यावेळी काही लोकांनी तिला फटाके भरलेले अननस खायला घातले. त्या मुक्या जनावराने अन्न मिळालं म्हणून आनंदात ते अननस खाल्ले. थोड्याच वेळात या हत्तिणीला त्रास व्हायला लागला. ती त्रास कमी व्हावा म्हणून नदीत जाऊन उभी राहिली, मात्र त्रास वाढत गेला आणि तिचा तिथेच मृत्यू झाला

Viral Video – नदीत माणूस बुडताना दिसला, पाहा हत्तीच्या पिल्लाने काय केलं

आपली प्रतिक्रिया द्या