Video – 6 डिसेंबर 1992 रोजी ऐतिहासिक चूक दुरुस्त केली गेली- प्रकाश जावडेकर

6 डिसेंबर 1992 रोजी एक ऐतिहासिक चूक दुरुस्त केली गेली असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. तसेच भगवान राम प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनात वसलेले आहेत असेही जावडेकर म्हणाले.

दिल्लीतील एका कार्यक्रमात जावडेकर म्हणाले की, जेव्हा विदेशी आक्रमक बाबर हिंदुस्थानात आले तेव्हा त्यांनी राम मंदिरच का पाडले? देशात लाखो मंदिरं आहेत पण त्यांनी राम मंदिर पाडले आणि तिथे वादग्रस्त बांधकाम केले.

या बांधकामाला मशीद म्हणता येणार नाही, कारण मशीदीत नमाज पडली जाते. आक्रमकांनी राम मंदिर पाडले कारण त्यांना माहित होते की या देशवासियांच्या आत्म्यात राम आहेत. म्हणून 6 डिसेंबर 1992 रोजी हे वादग्रस्त बांधकाम पाडून आपण एक ऐतिहासिक चूक दुरूस्त केली.

या घटनेचा मी साक्षीदार आहे. या वेळी लाखो कारसेवक आयोध्येत आले होते. आदल्या रात्री आम्ही तिथेच होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी संपूर्ण जगाने ते पाहिले की ती ऐतिहासिक चूक दुरुस्त केली गेली. आक्रमकांचा इतिहास संपूर्ण देशात संपवला जात आहे. म्हणून आपण नामांतर करत आहोत असेही जावडेकर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या