अभिनेता प्रशांत दामले लवकरच देणार आनंदाची बातमी!

रंगभूमीवरचा विक्रमवीर अभिनेता म्हणून ओळख असलेले अभिनेता प्रशांत दामले यांच्या नाट्य कलाकृती म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. त्यांच्या नाटकांचे हजारांवर होणारे प्रयोग हे त्याचंच प्रतीक आहे.

दिवसाला पाच पाच प्रयोग करूनही फ्रेश राहणारा आणि आपल्या निखळ विनोदाने प्रेक्षकांच्या मनात स्थान करणारा म्हणून प्रशांत दामले प्रसिद्ध आहे. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टवरूनच त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगत आहेत.

या पोस्टमध्ये प्रशांतने लवकरच एक मस्तशी आनंदाची बातमी देण्याविषयी म्हटलं आहे. त्याच्या पोस्टचा एकूण आविर्भाव पाहता आगामी काळात त्याच्याकडून एखादी कलाकृती प्रेक्षकांसमोर येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्याच्याखाली कमेंट करून आपली उत्सुकता जाहीर केली आहे.

चाहत्यांचे कौतुक आणि फिरकी

चित्रपट, मालिका आणि नाटक या तिघांमध्ये नाटक या माध्यमात सर्वाधिक रममाण झाल्यामुळे प्रशांत यांची रंगकर्मी म्हणून ओळख जास्त आहे. त्यामुळे त्यांचं एखादं नवीन नाटक येऊ घातलं असावं, असा अंदाज बांधायला सुरुवात झाली आहे. प्रशांत यांच्या पोस्टखाली चाहत्यांनी आपली उत्सुकता व्यक्त केली असून काहींनी आनंदाची बातमीवरून त्यांची फिरकीही घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या