बिमा मंडीच्या संचालकपदी प्रशांत कारुळकर

नामांकीत उद्योजक आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांची बिमा मंडीच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. विम्याचे जाळे वाढवून ग्रामीण भागातील अर्थकारण मजबूत करण्यासाठी बिमा मंडी या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात विमा सुरक्षेची जास्त गरज आहे, परंतु शहरांच्या तुलनेत इथे विम्याचे जाळे अत्यंत कमी आहे. बचत आणि सुरक्षा अशी दोन उद्दीष्ट समोर ठेवून ग्रामीण भागात बिमा मंडी ही कंपनी विमा उत्पादनांची विक्री करणार आहे. सरकारी विमा उत्पादने, खासगी कंपन्यांची विमा उत्पादनांची विक्री करताना स्वत:ची काही उत्पादने कंपनी बाजारात आणणार आहे.

ग्रामीण भारताला आर्थिक सुरक्षेचे मजबूत कवच प्रदान करणे हे कंपनीचे उद्दीष्ट असल्याचे प्रशांत कारुळकर यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे डीजीटल माध्यमांचे महत्व प्रकर्षाने समोर आले आहे. त्यामुळे दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा विषय ग्रामीण भागांतील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. टप्प्या टप्प्याने ग्रामीण भारतात कंपनीचा विस्तार करण्याचे आमचे धोरण आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या