प्रशांत किशोर यांचा जदयूत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

विविध पक्षांच्या निवडणुकीची रणनीती आखणारे प्रशांत किशोर हे आता स्वत: राजकारणात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लावत ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे.

रविवारी संयुक्त जनता दलाच्या (जदयू) कार्यकारिणीच्या बैठकीत प्रशांत किशोर औपचारिकरित्या जदयूत प्रवेश केला. किशोर हे सुरुवातीपासूनच नितीश कुमार यांचे खास व्यक्ती होते. 2015 च्या निवडणूकीत नितीश कुमार यांच्या विजयात प्रशांत किशोर यांचा मोठा हात होता. आता जदयूमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशांत 2019 मधील निवडणुका लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार ?