प्रशांत किशोर यांनी घेतली प्रियंका गांधींची भेट, चर्चेला उधाण

जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती ठरवणारे प्रशांत किशोर यांनी अलीकडेच राजकीय पक्षाची स्थापना केली. नुकतीच झालेली विधानसभा निवडणूकही त्यांच्या पक्षाने लढवली. मात्र त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसलाही बिहारमध्ये फारसे यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर किशोर आणि प्रियंका गांधी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. प्रशांत किशोर यांची काँग्रेस प्रवेशाची ही चाचपणी तर नाही ना, असा तर्कही लढवला जात आहे.

प्रियंका म्हणाल्या, ही बातमी आहे का?

प्रशांत किशोर यांच्या भेटीविषयी पत्रकारांनी प्रियंका गांधी यांना विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. ‘ही काही बातमी आहे का? सत्ताधारी संसद चालू देत नाहीत यावर तुम्ही प्रश्न का विचारत नाही,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला.