समन्स कशाला, एक कॉल करा, दोन तासांत हजर होईन – प्रताप सरनाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडीने मला पुन्हा बोलावलेले नाही पण तपासासाठी माझी गरज वाटली तर समन्स पाठवू नका एक कॉल करा, दोन तासात ईडीच्या कार्यालयात हजर होईन अशी स्पष्ट भुमिका शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली. या पुढे जेव्हा ईडी बोलावेल तेव्हा त्यांना संपूर्ण सहकार्य करेन असेही सरनाईक यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्याच्या पुटुंबीयाना दिलासा दिला आहे. तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत.

आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या कार्यालयात आले. सायंकाळी साडेपाच वाजता बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

ईडी अधिकाऱयांच्या मनात ज्या काही शंका होत्या त्या दूर केल्या. राजकीय, कौटुंबिक आणि व्यावसायिक विषयावर विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरे दिली, असे सरनाईक म्हणाले.