काँग्रेस नगरसेवकांनी एमआयएममध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांची अशोक चव्हाणांवर टीका

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना काँग्रेसची साथ सोडून दहा माजी नगरसेवकांनी एमआयएममध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर टिका करत ही अशोकरावांची चाल असून अशोकरावांना आता भाजप हिरवा करायचा आहे, या शब्दात त्यांच्यावर प्रखर टिका केली आहे.

2012 मध्ये एमआयएम पक्षाने 11 उमेदवार निवडून आणले होते. कालांतराने त्यातील काही जणांनी परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जवळपास 25 वार्डात मुस्लिमांची ताकद असल्याने व मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल भाग असल्याने काँग्रेसच्या दहा माजी नगरसेवकांनी एमआयएमचा पतंग हाती घेवून प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची खेळी असून, एमआयएम कोणाच्या इशार्‍यावर चालली आहे, नांदेडात एमआयएम कुणी आणली व कुणी मोठी केली हे सगळ्या जनतेला माहित आहे. भारतीय जनता पक्ष हा चव्हाणांना हिरवा करायचा आहे, ही चव्हाणांचीच चाल असल्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे अशोक चव्हाणांनी त्याला प्रत्युत्तर देत एमआयएमचा आणि आमचा काडीचा काही सबंध नाही, त्यांना माणसं मिळत नाहीत ती पक्षात का टिकली नाहीत, याचे आत्मपरिक्षण काँग्रेसने करावे, राष्ट्रवादीला देखील त्या भागात उमेदवार मिळत नसल्याने आणि निवडणुकीत प्रचाराचे कुठलेही मुद्दे नसल्याने चिखलीकर अशी टिका करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर याच वादात काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी उडी घेत काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा एमआयएममध्ये प्रवेश ही सर्व चाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची असून, काँग्रेस संपविण्याचा त्यांचा डाव असून, नांदेडची जनता ही सेक्युलर विचारसरणीची जनता आहे, नांदेडची जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभी राहिल, अशोक चव्हाण ज्याप्रमाणे नांदेडमध्ये राजकारण करत आहेत, त्याला जनताच निवडणुकीत मतदानाव्दारे उत्तर देईल, असेही खासदार चव्हाण म्हणाले.

नांदेड जिल्ह्यात बिलोली आणि धर्माबाद येथे मराठवाडा जनहित पक्षाचा प्रयोग करुन भाजपची बी टीम तयार करण्यात आली. त्यात बिलोलीत या पक्षाने एकहाती सत्ता मिळवली. त्याच्याच दुसर्‍या दिवशी या पक्षाचे प्रमुख नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी आपला भारतीय जनता पक्षाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून आम्ही माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केल्याने राजकारणात एकच कलाटणी मिळाली होती. दुसरीकडे धर्माबादेत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द चव्हाणांनीच मराठवाडा जनहित पार्टी उभी करुन त्याठिकाणी अध्यक्ष व काही नगरसेवक निवडून आणले होते हे विशेष.