शेअर मार्केटमध्ये उतरताना… व्यवहाराची भाषा समजून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण धोपट

कोणताही व्यवसाय असो, वस्तू कमी किमतीला विकत घेणं आणि जास्त किमतीला विकणं हेच तत्त्व अमलात आणलं जातं. विकणाऱ्याला जास्त किमतीत विकण्याच्या आणि विकत घेणाऱ्याला कमी किमतीत विकत घेण्याच्या आशेवर व्यवसायाचा डोलारा आणि नफा-नुकसानीचं गणित अवलंबून असतं.

शेअर मार्केट हा कितीही आणि कसाही विचार केला तरी खरेदी-विक्रीचाच व्यवसाय आहे. म्हटला तर भाजीचा बाजार जसा आणि जितका सोपा असतो, शेअर बाजारही तसा आणि तितकाच सोपा असतो. भाजी मंडईमध्ये भाजीवाला कोथिंबिरीची जुडी विकायला बसलेला असतो. आङ्ग-दहा रुपयांना विकत घेतलेली जुडी त्याने बारा रुपयांना विकायला ठेवलेली असते आणि त्याच्यासमोर हातात रोख रक्कम घेऊन दहा रुपयांना देतोस का? असं ग्राहक विचारीत असतो. दोघांच्याही मनात आपल्या फायदा-नुकसानीचा विचार असतो, पण विकणाऱ्याची आणि विकत घेणाऱ्याची गरज, बाजाराची वेळ, बाजारात असलेल्या ग्राहकांची संख्या यावर ती जुडी विकणारा बारा रुपयांना विकतो, विकत घेणारा दहा रुपयांवर अडून बसतो की अकरा रुपयांच्या तडजोडीवर सौदा पक्का होतो या गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी जर मंडईमध्ये आवकच नसेल तर तीच कोथिंबिरीची जुडी वीस रुपयांनाही विकली जाते आणि आवक भरपूर असेल तर दोन रुपयांवर आलेल्या किमतीलाही कुणी विकत घेत नाही अशी परस्थिती असते.

शेअर बाजाराचा व्यवहार सोपा असला तरी त्या व्यवहाराची भाषा वेगळी असते. ती भाषा आणि त्या व्यवहारात वापरले जाणारे काही शब्द वानगीदाखल इथे देत आहे. स्टॉक, सिक्युरिटीज, आस्क, बिड, क्लोज, डिमांड, सप्लाय, बुल्स- बिअर्स, ट्रेड, ट्रेंड, इक्विटी, एक्स्चेंज, ऑर्डर, आयपीओ, एनएससी, बीएससी, सेबी, निफ्टी, सेन्सेक्स, पोर्टफोलिओ, डेरिव्हेटिव्ह, ऑप्शन्स, फ्युचर्स, कॉल, पुट, स्ट्राईक प्राईस, प्रीमियम, कमॉडिटी, ओपन इंटरेस्ट, डिव्हिडंड, इंडेक्स, लिव्हरेज, मार्जिन, इनिशिअल मार्जिन, अॅन्युअल रिपोर्ट, आर्बिट्राज, अॅव्हरेज, व्होलॅटॅलिटी, बिटा, अल्फा, गामा, ब्ल्यू चिप, ब्रोकर, मूव्हिंग अॅव्हरेज, शॉर्ट सेलिंग, लार्ज पॅप, मिड पॅप, स्मॉल पॅप, सेक्टर्स इत्यादी. यथावकाश आपण त्या शब्दांच्या मुळाशी जाणारच आहोत.

आपण या व्यवसायात नवीन असाल तर हे शब्दही आपल्यासाङ्गी नवीन असतील. या शब्दांनी गडबडून जाऊ नये. शब्द कळले म्हणजे व्यवसाय कळला असंही होत नाही, पण व्यावहारिक शब्द ही त्या त्या व्यवसायाची पहिली पायरी असते. ती ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही इतके मात्र खरे.

(लेखक दिपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)