
सामना ऑनलाईन, पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांनंतर ते ठणठणीत बरे व्हावेत यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना करायला लागले आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अनेकांनी गणरायाला साकडे घातले तर मडगावमध्ये मुसलमानांनी कुराण पठण करून त्यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना केली.
राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना उपचारासाठी दिल्लीत एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. त्यापूर्वी त्यांच्यावर मुंबई आणि अमेरिकेत उपचार करण्यात आले होते. ते बरे व्हावेत यासाठी डॉ. प्रमोद सावंत व पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पार्से सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गजाननाकडे प्रार्थना केली.
























































