जय हिंद! आपल्या सशस्त्र दलासाठी प्रार्थना; आदित्य ठाकरे यांनी जवानांबाबत व्यक्त केली कृतज्ञता

हिंदुस्थानी सैन्याने साहस दाखवत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. त्यानंतर पाकड्यांकडून कुरापती सुरू असून नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार सुरू आहे. हिंदुस्थानी जवान पाकड्यांच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देत आहे. या सर्व घडामोंडीबाबत इंस्टाग्रॅमवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पोस्ट करत आपल्या सुरक्षा दलातील जवांनाबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, दहशतवाद्यांशी लढतानाही, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांसाठी प्रार्थना. आपल्या सर्व नागरिकांसाठीही प्रार्थना. जय हिंद!, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.