मराठवाड्यात मान्सूनपूर्व सरी; नांदेड, धर्माबाद परिसरात पावसाची हजेरी

687

नांदेड शहर व परिसर तसेच जिल्ह्यात अर्धापुर, लोहा धर्माबाद, मुदखेड, कुंडलवाडी परिसरात काल रात्री सकाळी रिमझिम ते मध्यम पाऊस झाला. कुंडलवाडी परिसरात ढगांच्या गडगडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसाने कडक उन्हामुळे वाढलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पाऊस थांबला होता. पण ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. जिल्ह्यातील अनेक भागात तसेच नांदेड शहर व परिसरात 31 मे सांयकाळी 6 वाजेपासूनच वातावरण ढगाळ झाले होते. गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उन्हापासून नागरिक त्रस्त होते. काल रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात व आज सकाळी पहाटपासूनच हलक्या पावसाच्या सरींना सुरुवात झाली होती. पण दिवस उजडत असताना सकाळी 7 वाजता पावसाचा जोर वाढला व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

सध्या खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी मशागती कामाकडे वळले आहेत. या अचानक झालेल्या पावसाने शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. नांदेड चे तापमान गेल्या आठवड्यात 45 अंशावर गेले होते गेल्या दोन दिवसातील वातावरण बदलाने नांदेडकर मात्र सुखावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या