
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. अशातच पोलीस, आरोग्यसेवक यासारखे कोरोना वॉरियर्स आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करतायत. सध्या सुरतमधील एका परिचारिकेचे फोटो व्हायरल होत आहेत. ही परिचारिका चार महिन्यांची गरोदर असून रोजा ठेवत ती धर्म आणि कर्तव्य अशा दोन्ही जबाबदाऱया पार पाडतेय. नेटिझन्सने त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे.
नॅन्सी आयझा मिस्त्री असे या परिचारिकाचे नाव असून ती सुरतमधील एका कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची काळजी घेत आहे. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने नॅन्सी यांनी रोझे ठेवले आहेत. ’परिचारिका म्हणून मी माझं कर्तव्य बजावत आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे,’ असे नॅन्सी सांगतात. नॅन्सी यांची कर्तव्यनिष्ठा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. नॅन्सी आणि होणाऱया बाळाचे आरोग्य सुखरूप राहो, अशा प्रार्थना नेटिझन्स करत आहेत.
























































