
>> अभिजित कुळकर्णी, सीए (योगशिक्षक, भारतीय योग मंदिर)
श्वासोच्छ्वासाची आणि दृष्टीची स्थिरता ही ध्यानासाठी अत्यंत आवश्यक आहे. मनात जितके जास्त विचार तितकी दृष्टी चंचल आणि श्वासोच्छ्वास अनियमित असतो. त्यासाठी श्वासोच्छ्वास आणि दृष्टी स्थिर केल्यास मनही स्थिर होते.
शुचिर्भूत होऊन एका स्वच्छ ठिकाणी ध्यानासाठी बसावे. स्वच्छ, साधे, मुलायम आसन बसण्यासाठी घ्यावे. प्रथम कपालभाती आणि भस्त्र्ाका करून आपली श्वसनसंस्था स्वच्छ करावी. उज्जायी आणि अनुलोम-विलोम करून नाडी-शुद्धी करावी. शीतली आणि सित्कारी प्राणायामांचा अभ्यास करून मन शांत करावे. प्राणायामाच्या अभ्यासाने आपला श्वास नियमित होतो, स्थिर होतो. नंतर त्राटक किंवा दृष्टी प्रयोग करून आपली दृष्टी स्थिर करावी.
ध्यानासाठी सिद्धासन, पद्मासन, स्वस्तिकासन, सुखासन… यांपैकी आपल्याला सहज घालता येणाऱया आसनात बसावे. योगेशवर कृष्णांनी म्हटल्याप्रमाणे ध्यानस्थ बसण्याची स्थिती पुढीलप्रमाणे असावी.
आपला पाठीचा कणा सरळ ताठ असावा. हनुवटी जमिनीला समांतर ठेवावी. पाठ, मान आणि मस्तक एका रेषेत असले म्हणजे मूलाधारातील ऊर्जा ऊर्ध्वगामी होण्यास मदत मिळते. शरीर अचल आणि मन स्थिर ठेवावे. डोळे बंद ठेवल्याने मन भरकटण्याचे प्रमाण कमी होते. यानंतर आपली दृष्टी भ्रूमध्यात म्हणजे जिथे आज्ञाचक्र आहे तिथे किंवा जिथे आपण टिळा वा कुमकुम लावतो तिथे पेंद्रित करावी.
पंचमहाभुते आणि ध्यानाचे विभिन्न स्तर
पृथ्वी, आप (जल), तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांपासून सृष्टी बनली आहे. ही तत्त्वे पृथ्वीपासून आकाशापर्यंत एकाहून एक सूक्ष्म आहेत आणि ह्या तत्त्वांचा आधार ध्यानासाठी घ्यावा लागतो.
पृथ्वीतत्त्व हे सर्वात जडतत्त्व असल्याने सुरुवातीला मन एकाग्र करण्यासाठी पृथ्वी तत्त्वापासून बनलेल्या वस्तूंचा आधार घ्यावा लागतो. उदाहरणार्थ एखाद्या मूर्तीवर, शिल्पावर, चित्रावर किंवा वस्तूवर आपली दृष्टी आणि विचार पेंद्रित करावे. मूर्ती पूजेच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश हाही आहे की मूर्तीचे स्वरूप आपल्या मनाला आकर्षित करते आणि म्हणूनच मनाच्या एकाग्रतेसाठी मूर्तीपूजेचा आधार घ्यावा.
जलतत्त्व हे पृथ्वीपेक्षाही सूक्ष्म आहे, पण ते प्रवाही असल्यामुळे त्यावर ध्यान पेंद्रित करणे हे अधिक कठीण आहे आणि म्हणूनच ध्यानाच्या अभ्यासाच्या दुसऱया स्तरावर याचा अभ्यास करावा. शिवपिंडीवर होणाऱया अभिषेकाच्या जलधारेवर आपले लक्ष पेंद्रित करणे ही ध्यानाच्या अभ्यासाची दुसरी पायरी होईल.
तेजतत्त्व अर्थात अग्नी, प्रकाश हे तत्त्व पृथ्वी आणि जलतत्त्वांपेक्षाही सूक्ष्म आहे. अभ्यासाच्या तिसऱया स्तरावर आपण एखाद्या ज्योतीवर आपली दृष्टी आणि मन एकाग्र करू शकतो. गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाच्या ज्योतीचा प्रकाश हा शुद्ध तेजस्वी असतो आणि ही ज्योतही अधिक स्थिर असते म्हणून अशा ज्योतीवर आपले लक्ष पेंद्रित करावे. दृष्टी आणि मन स्थिर झाल्यानंतर सावकाशपणे डोळे बंद करून भ्रूमध्यात उभ्या राहणाऱया ज्योतीच्या प्रतिमेवर लक्ष पेंद्रित करून शांत बसावे. या ज्योतीचा प्रकाश हळूहळू आपल्या शरीरातील कणाकणाला व्याप्त करीत आहे अशी कल्पना करावी. या तेजाचे वलय सर्व शरीराभोवती निर्माण झाले आहे अशी धारणा करावी. नंतर पुन्हा भ्रूमध्यात ज्योती प्रतिमेवर मन पेंद्रित करून काही काळ स्थिर बसावे.




























































