इस्रायलचे राष्ट्रपती पोप लियो यांना भेटले

इस्रायलचे राष्ट्रपती इस्साक हर्जोक यांनी गुरुवारी पोप लियो (चौदावे) यांची भेट घेतली. गाझा आणि व्हॅटकीनमध्ये होत असलेली युद्धे तत्काळ थांबवण्यात यावी, तसेच हमासने ज्या लोकांना ओलीस ठेवले आहे, त्यांची तत्काळ सुटका करून त्यांना आमच्याकडे परत सुपूर्द करावे, अशी मागणी राष्ट्रपतींनी केली. ओलिसांची सुटका करण्यासाठी जागतिक स्तरांवर यहुदीविरोधी लढा देण्यावर आणि मध्य पूर्वेतील ख्रिश्चन समाजाचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.