
- स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे भांडे म्हणजे प्रेशर कुकर. मात्र अनेकांकडे या कुकरची शिट्टी सतत खराब होते.
- नेहमी शिट्टी आणि कुकरचे झाकण स्वच्छ करायला हवे. शिट्टीच्या आतील छिद्र बारीक तारेने नेहमी स्वच्छ करा. शिट्टी स्वच्छ करताना साबणाच्या पाण्यात जास्त वेळ ठेवू नये.
- कुकरच्या झाकणाचे रबर साधारणतः दर सहा महिन्यांनी बदलावे. यामुळे शिट्टीवर जास्त ताण येणार नाही. तसेच अन्न शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. बनावट शिट्टीचा वापर करणे टाळा.


























































